जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Marathi Bhasha Gaurav Din Special Movies: रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी ‘रंगभूमी स्पॉटलाइट’ या विशेष विभागातून गाजलेली मराठी नाटकेही सादर केली जाणार आहेत.
marathi bhasha din

marathi bhasha din

esakal

Updated on

‘मराठी भाषा गौरव दिन’ हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रंगणाऱ्या या विशेष सोहळ्यात १९९० नंतरच्या दशकांतील गाजलेले आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेले चित्रपट पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. अल्ट्रा झकासच्या ४,०००+ तासांच्या लायब्ररीतून १,५०० पेक्षा अधिक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. या ‘स्ट्रीम फेस्ट’मध्ये २५ निवडक चित्रपटांचा खास समावेश करण्यात आला असून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, थ्रिलर आणि भावनिक अशा विविध चित्रपटसृष्टीची ताकद प्रेक्षकांना अनुभवता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com