

‘Big Boss’ 2026 Latest Marathi News:
Sakal
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्यात अनोखा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सहाव्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? याची चर्चा सुरु होती. अखेर भाऊच्या धक्क्यावर सर्वांसमोर सहाव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत खान्देशचा किंग सचिन कुमावतचं एलिमिनेशन झालं. घराबाहेर आल्यावर सचिन कुमावतनं सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.