Senior Actor Sachin Pilgaonkar
esakal
अलीकडच्या काही वर्षांत चित्रपट किंवा मालिका प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी माध्यम उपलब्ध झाले आहे, त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मचा अधिक प्रमाणात वापर होत आहे. ओटीटीचा परिणाम चित्रपटगृहांवर होऊ नये, यासाठी अधिक चांगल्या प्रकारचे चित्रपट निर्माण करावे लागतील. स्पर्धेत अधिक जण असतील तर स्पर्धा समजून घेत पुढे जाणे आवश्यक असून, ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिटी ऑफ ड्रीम्समध्ये काम करण्याचा अनुभव चांगला होता, असे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी बेळगावात ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.