

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात येत आहे. चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतीत निर्माते मयूर अर्जुन खरात, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर, दिग्दर्शक पराग सावंत यांनी नाराजी व्यक्त केली असून नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली.