

mukkam post devacha ghar
esakal
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “फिल्म बाजार” विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा “फिल्म बाजार - २०२५” करिता "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे .