पावलंस रे बा देवा महाराजा! कोकणच्या मातीतला 'दशावतार' आता थेट ऑस्करच्या शर्यतीत; १५० चित्रपटात मिळवलं स्थान

konkan-folk-art-dashavatar-movie-enters-oscar-2026-race: 'दशावतार' हा कोकणच्या मातीतला चित्रपट आता थेट ऑस्करवारीला पोहोचला आहे. ९८व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत या चित्रपटाची निवड झालीये.
dashavtar in oscar 2026

dashavtar in oscar 2026

esakal

Updated on

२०२५ मध्ये सर्वाधिक गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे 'दशावतार' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. कोकणाचा राखणदार आणि तिथला खरा दर्शवताराचा खेळ खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यत पोहोचवला. मात्र आता या चित्रपटाने मोठी झेप घेतली आहे. प्रेक्षकांसाठी खास ठरलेला हा चित्रपट आता ऑस्कर पर्यंत पोहोचलाय. 'दशावतार' चित्रपटाने इतिहास रचलाय. ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या (Academy Awards) मुख्य स्पर्धेत या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडल्या गेलेल्या १५० चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध खानोलकर याने एक पोसत करत याची माहिती दिलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com