
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात पाहायला मिळणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेल्या 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.