

kamali new twist
ESAKAL
'कमळी' ही झी मराठीवरील सध्या सर्वाधिक गाजणारी मालिका आहे. त्यात स्टार प्रवाहच्या टीआरपीच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम कमळी या मालिकेने केलंय. गेले कित्येक आठवडे ही मालिका टीआरपीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. अशातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे. अखेर मालिकेत कमळी आणि तिच्या आईची भेट होणार आहे. मात्र त्यानंतर एक वेगळीच कथा दाखवण्यात येईल असा नेटकऱ्यांचा अंदाज आहे. प्रोमो पाहून काय म्हणालेत नेटकरी?