
सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. मालिकांच्या ऑन एअर आणि ऑफ एअर होण्याचं सगळं गणित त्यांच्या टीआरपीवर अवलंबून असतं. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असेल तर त्याचा टीआरपी चांगला असतो. मात्र प्रेक्षकांना मालिका आवडली नाही तर मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. आता गेल्या आठवड्याचा टीआरपी समोर आलाय. यात झी मराठीची नवी मालिका प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतेय.