
सिनेमा आणि ओटीटीच्या प्रभावामुळे नाटक मागे पडेल असं अनेकांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. उलट, आता डिजिटल काळातील रंगभूमी नव्या पायरीवर पोहोचतेय. समांतर नाट्यप्रवाह, एकांकिका, डिजिटल थिएटर आणि इमर्सिव्ह थिएटर यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे रंगभूमीला नवसंजीवनी मिळतेय. आणि या 'वर्ल्ड थिएटर डे' निमित्त आपण भूतकाळ आणि भविष्य दोन्ही जपण्याचा संकल्प करूया! कारण ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’! या खास उपक्रमात, ती खास तिसरी घंटा पुन्हा वाजणार आणि प्रेक्षकांना ७० हून अधिक भन्नाट मराठी नाटकांचा आनंद डिजिटल माध्यमातून अल्ट्रा झकास ओटीटीवर पाहता आहे. अनेक जुनी अजरामर नाटकं प्रेक्षकांना अल्ट्रा झक्कास ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.