आई-मुलीची थरारक लढाई अन् डिजिटल युगाचं काळं वास्तव; कसा आहे 'मर्दिनी'?

MARDINI MARATHI MOVIE REVIEW:श्रेयस आणि दीप्ती तळपदे निर्मित 'मर्दिनी' हा चित्रपट आई-मुलीच्या भावनिक नात्यासोबतच सायबर क्राईम, डेटा प्रायव्हसी आणि डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांवर प्रभावी भाष्य करतो.
MARDINI MARATHI MOVIE REVIEW

MARDINI MARATHI MOVIE REVIEW

esakal

Updated on

PRARTHANA BEHERE MARDINI MOVIE: मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी इनिंग खेळणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेने नावीन्यपूर्ण चित्रपट आणि त्यातील विविधांगी भूमिका करण्याचा प्रयत्न केला आहे. विनोदी असो वा गंभीर प्रत्येक भूमिका त्याने समरसून साकारली आहे. अभिनेता म्हणून यशस्वी कामगिरी करीत असताना चित्रपट निर्मितीही केली आहे. ‘सनईचौघडे’, ‘पोश्टर बाॅईज’ अशा काही मराठी चित्रपटांची निर्मिती करून चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य ठेवले आहे. आता तो आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांनी ‘मर्दिनी’ हा चित्रपट आणलेला आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन अजय मयेकर यांचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com