
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला जपणार आहे' सध्या प्रेक्षकांची आवडती बनली आहे. मालिकेतील पात्र आणि त्याची आगळीवेगळी कथा यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. यातील मुख्य अभिनेत्री चिमुकली महिमा म्हात्रे म्हणजेच मीरा, प्रतीक्षा शिवणकर म्हणजेच अंबिका, अर्थव आणि चिमुकली वेदा ही सगळीच पात्र प्रेक्षकांची अतिशय लाडकी आहेत. या मालिकेत मंजिरी ही सतत मार्जरीला भेटायला जाताना दाखवण्यात आली आहे. ती मार्जरी ही २०० वर्ष एका काळोख्या गुहेत उडणारी चेटकीण दाखवण्यात आहे. मात्र ही भूमिका कोण साकारतंय तुम्हाला ठाऊक आहे का?