

MAYA MOVIE TRAILER
esakal
नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. कारण ते केवळ कथा सांगत नाहीत, तर आयुष्यात व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना शब्द देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘माया’ या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘माया’चा ट्रेलर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो, माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गैरसमजुती, मनात साचत जाणाऱ्या अढी आणि त्या अढीमुळे दुरावत जाणारी माणसं यांचा भावनिक प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.