
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतुन घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने हिंदी मालिकांमध्येही आपला ठसा उमटवला. तिचा निरागस चेहरा आणि हसू प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अगदी सहज सुंदर अभिनय करत तिने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. मात्र पाच वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं. २०२० मध्ये संपूर्ण जग करोनाशी लढत असताना मयुरीच्या पतीने आत्महत्या केली. तिचा नवरा आशुतोष भाकरे याने राहत्या घरी गळफास घेतला. आता या कठीण प्रसंगातून ती कशी बाहेर पडली हे तिने मुलाखतीत सांगितलंय.