
mayuri wagh
esakal
'अस्मिता' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिला या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळून दिली. याच कार्यक्रामुळे ती घराघरात पोहोचली. मयुरी ने अस्मिता बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही प्रेक्षकांना तिची ओळख अस्मिता म्ह्णूनच आहे. याच मालिकेच्या सेटवर तिची ओळख पियुष रानडे याच्याशी झाली. त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यांचं लग्नही झालं. मात्र पुढे वर्षभरांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या बाबतीत मयुरी कुठेही काहीही बोलली नव्हती. मात्र आता पहिल्यांदाच एका मुलाखतीत तिने तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे.