

DRUSHTA LAGNYA JOGE SARE SONG REAL STORY
ESAKAL
असे अनेक जुने चित्रपट आहेत ज्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका' या विनोदी चित्रपटांच्या आधी काही कौटुंबिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं. अशाच काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे राजदत्त यांचं दिग्दर्शन असलेला 'माझं घर माझा संसार' हा चित्रपट. हा चित्रपट अनेक प्रेक्षकांनी पाहिलाय. काहींना हा चित्रपट पाहिला की रडू येतं तर काहींना आपल्या आयुष्यातील प्रसंग आठवतात. या चित्रपटातलं एक गाणं प्रचंड गाजलं ते म्हणजे 'दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोटही कुठे नसे'. मात्र या गाण्यात दाखवण्यात आलेली गोष्ट ही खोटी नसून खरी आहे.