
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेघा धाडे हिने 'बिग बॉस मराठी' मधून लोकप्रियता मिळवली. बिग बॉस मराठीच्या घरात मेघाने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. तिने बिग बॉस मराठीचा पहिला सीझन जिंकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मेघाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर तिला साक्षी नावाची मुलगी आहे. ती मुलीचा एकटीने सांभाळ करत होती. काम सांभाळत ती मुलीला सांभाळत होती. मात्र तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे मेघाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. काय घडलेलं नेमकं?