

meghana erande
esakal
दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यात फराळ, घराची साफसफाई, आकाशकंदील, रांगोळी आणि कुटुंबासोबतचे क्षण खूप महत्वाचे ठरतात. आपल्या बालपणी साजरी केलेली दिवाळी ही काही वेगळीच असते. ती दिवाळी आयुष्यभर लक्षात राहते. अशीच एक 'सनई चौघडे' मालिकेतील अभिनेत्रीने दिवाळीची आठवण सांगितली आहे. ही अभिनेत्री आहे मेघना एरंडे. तिने फटाके न फोडण्याचं कारणही सांगितलंय.