
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत स्त्री आणि पुरुष यांच्यातील मानसिकतेच्या फरकावर मत मांडले होते. तिने दिलेलं उदाहरण साधं असलं तरी, त्यातून ती स्त्रियांची कार्यक्षमता आणि पुरुषांच्या कामाच्या पद्धती यावर भाष्य करत होती; मात्र तिच्या या विधानावर अभिनेता सुमीत राघवनने थेट नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर दोघांचे विचार चांगलेच चर्चेत आले आहेत.