
आज पॅनोरमा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेलं “मेरी दुनिया तू” हे हिंदी गाणं संगीतप्रेमींसह सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. देशभक्ती आणि प्रेम यांच्या संगमातून साकारलेलं हे गाणं एका नवविवाहित भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. सैनिकाच्या देशसेवेच्या कठोर वास्तवासह त्याच्या पत्नीच्या प्रेमाची आणि त्यागाची हृदयस्पर्शी कहाणी यातून उलगडते. हे गाणं प्रेक्षकांना भावनिक प्रवासावर घेऊन जातं आणि प्रेम म्हणजे केवळ साथ नव्हे, तर त्यागाची तयारी असते, हा संदेश प्रभावीपणे मांडतं.