

STAR PRAVAH SERIAL OFF AIR
ESAKAL
Star Pravah Serial: सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका पाहायला मिळतायत. अनेक वाहिन्यांवर नवनवीन विषय असलेल्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतायत. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका सुरू झालीये. अशीच एक मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे ज्याची घोषणा २ महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. आता नागपंचमीच्या मुहूर्तावर या मालिकेचं शूटिंग सुरू करण्यात आलंय. या सोबतच आणखी एका मालिकेचं शुटिंगही सुरू झालंय. कोणत्या आहेत या मालिका?