गौर कांती, घारे डोळे... 'ही' अभिनेत्री साकारणार स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये मुख्य भूमिका; अखेर चेहरा समोर

MI KAAT TAKLI LEAD ACTRESS FACE REVEALED: स्टार प्रवाहवरील 'मी कात टाकली' या मालिकेत आता कोणती अभिनेत्री नागिणीच्या भूमिकेत दिसणार हे अखेर समोर आलंय.
mi kat takli lead actress name reveals

mi kat takli lead actress name reveals

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता लवकरच काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात स्टार प्रवाहने दोन महिन्यापूर्वी तब्बल ८ नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यातील काही मालिका सुरू झाल्यात. तर काही होणार आहेत. त्यातलीच एक नवीन मालिका म्हणजे 'मी कात टाकली' या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाहने प्रदर्शित केला होता. मात्र यात मुख्य भूमिकेत कोण दिसणार, त्यातील नागीण कोण असणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर आता त्याचा उलगडा झालाय. स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली' मध्ये कोण नागीण साकारणार हे समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com