

ARCHANA PATKAR
esakal
Aai Kuthe Kay Karte Serial: 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर तब्बल ४ वर्ष अधिराज्य केलं. या मालिकेतील आई ही घराघरात लोकप्रिय झाली. तिच्यासोबत मालिकेतील इतर कलाकारही. त्यातही मधुराणी प्रभुळकर आणि मिलिंद गवळी यांना या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सोबतच आप्पा आणि कांचन आजीही प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या. सुरुवातीला सुनेवर हुकूम गाजवणाऱ्या पण आपला मुलगा चुकलाय हे समजल्यावर त्याच सुनेच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कांचन आजी प्रेक्षकांना भावल्या. मालिकेत ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारली होती. मात्र या मालिकेदरम्यान त्यांना खूप त्रास झाला होता. मिलिंद गवळी यांनी त्यांच्या त्रासाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.