
'बिग बॉस मराठी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने तिच्या खेळाने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं. ती काही मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिने सगळ्यांचा रोष ओढवून घेतला होता. मात्र मीराच्या आयुष्यातही असं काहीतरी घडलंय ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. एका मुलासाठी तिने तिचा ठरलेला साखरपुडा मोडला आणि त्याच मुलाने तिची फसवणूक केली. या बद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.