Mirzapur 3 Twitter Review: जाळ अन् धूर संगटच! प्रेक्षकांना कसा वाटला मिर्झापूरचा सीझन ३; वाचा ट्विटर रिव्ह्यू

Mirzapur 3 Audience Review: मिर्झापूरचा तिसरा सीझन आता प्रदर्शित झाला आहे. आता प्रेक्षकांनी त्याचा रिव्ह्यूदेखील केला आहे.
mirzapur 3
mirzapur 3 sakal

गेले चार वर्ष प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या 'मिर्झापूर' सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि हा सीझन प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सीरिजमध्ये अली फजल आणि पंकज त्रिपाठी, गुड्डू भैया आणि कालीन भैया यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. ट्रेलर पाहून प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते. तर या सीझनमध्ये कालीन भैया परत येणार हे पाहून चाहते उत्साहीत झालेले. आज ५ जुलै रोजी अमेझॉन प्राइमवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे आणि आता नेटकरी ट्विटरवर त्यांना हा सीझन कसा वाटला याबद्दल सांगत आहेत.

या सीरिजचा एक एपिसोड ४५ ते ६० मिनिटांचा आहे. आणि यात एकूण १० एपिसोड आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना हा सीझन आवडला असल्याचं सांगितलं आहे. एमजे कार्टेलनावाच्या युझरने लिहिलं, 'मिर्झापूर ३' हा खूप चांगल्या पद्धतीने लिहिला गेला आहे. खूप चांगला एडिट करण्यात आला आहे. सगळ्यांनी त्यांचं काम खूप छान पद्धतीने केलं आहे. कलीमने पुढील सीझनमध्ये गुड्डू आणि गोलू यांच्या विरोधात हातमिळवणी केली आहे. मिर्झापूर १ अजूनही सगळ्यात चांगला आहे.'

दुसऱ्या युझरने लिहिलं, 'याला म्हणतात खरा राडा. बघूया या गाडीचा खरा हकदार कोण आहे. मिर्झापूर ३चा पहिला एपिसोड ह्युमर, डायलॉग आणि सीनसोबत जुना दमदार स्वॅग परत आला' एका युझरने लिहिलं, 'मालिकेचा पहिला भाग कथेची मांडणी करतो तर एक सीन कालीन भैयासोबत संपतो. पण मुन्ना भैया यांची उपस्थिती अंगावर काटे आणते. हा सगळा सेटअप पुढच्या एपिसोडमध्ये मोठा ट्वीस्ट आणण्यास उपयुक्त ठरतो. पूर्वांचलच्या खुर्चीचा बाहुबली कोण?'

एका युझरने लिहिलं, 'पहिल्या दोन सीझनपेक्षा हा सीझन जास्त चांगला आहे. कथेपासून बाकी सगळंच खूप छान पद्धतीने केलं गेलं आहे. यावेळेस हे बघा की ताकदीने काम होतंय की गुड्डू भैया आपल्या डोक्याने मिर्झापूरची सत्ता पालटणार. आता असं काहीतरी होणार आहे जे मिर्झापूरच्या इतिहासात कधीच नाही झालं.' एकूणच मिर्झापूर ३' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

mirzapur 3
Shah Rukh Khan: अरे हे किती भारी आहे... मरीनवरील परेड पाहून किंग खान भारावला; टीम इंडियासाठी केलेली पोस्ट चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com