बॉलिवूडमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलर जॉनर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आणि याच पठडीतील चित्रपट 'मिशन ग्रे हाऊस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरने अंधाऱ्या रात्रीच्या गूढ घरात सुरू होणाऱ्या रहस्यमय घटनांची झलक दाखवली आहे.