

mithun chakraborty
esakal
बॉलिवूडचा 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. मिथुनने १९७९ मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल हेलेना ल्यूक हिच्याशी लग्न केलं. मात्र, हे नातं फक्त चार महिने टिकलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. हेलेना ल्यूकने 'मर्द', 'दो गुलाब' आणि 'आओ प्यार करें' सारख्या चित्रपटांत काम केलेलं. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' चित्रपटात त्यांनी ब्रिटिश राणीची भूमिका साकारली होती. मात्र अशा गोड अभिनेत्रीसोबत लग्न करूनही मिथुन स्वतःचा संसार चार महिनेही का टिकवू शकला नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.