
सोशल मीडिया आल्यापासून त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव प्रत्येकाला येतात. काही लोक आपला दिवस चांगला घालवण्यासाठी याचा वापर करतात.काही केवळ आपला वेळ घालवण्यासाठी, काही शिकण्यासाठी तर काही केवळ दुसऱ्यांना ट्रोल करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. त्यातही चित्रपटसृष्टीतले कलाकार सगळ्यांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी काहीही केलं तरी त्यांना ट्रोल केलं जातं. अशीच ट्रोलिंग सध्या 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिला सहन करावी लागत आहे. मात्र अभिनेत्रीदेखील तिच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलंय.