
'गोल्ड' , 'ब्रम्हास्त्र' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला. तिने सगळ्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. टीव्ही अभिनेत्री ते मोठा पडदा असा प्रवास तिने केलाय. ती सोशल मीडियावरही चर्चेत असते. मात्र आता मौनी एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिचा न्यू इयर पार्टीनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती धपकन खाली पडताना दिसतेय.