

MOUNI ROY
ESAKAL
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हरियाणातील करनाल येथे एका कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र या कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला. आता याबद्दल एक पोस्ट करत तिने घडलेली सगळी घटना प्रेक्षकांना सांगितली आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही पुरुषांनी, ज्यात वयस्कर व्यक्तीही होत्या, त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचा आरोप मौनीने केला आहे. माझ्यासारख्या स्त्रीसोबत असं घडत असेल तर इतर स्त्रियांचं काय होत असेल असंही ती म्हणालीये.