
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे नाव आजही सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते. आपल्या अभिनय कौशल्याने आणि व्यक्तिमत्त्वाने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र त्यांच्या यशाच्या प्रवासाबाबत अनेक किस्से ऐकायला मिळतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबाबत काही रोचक खुलासे केले.