
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस प्रेक्षकांची मनं जिंकतेय. ती सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेत ती नंदिनीची भूमिका साकारतेय. या मालिकेत ती शांत पण खंबीर व्यक्तिरेखा साकारतेय. मृणाल सोशल मीडियावरही चर्चेत असते. आता तिची एक मुलाखत चाहत्यांमध्ये व्हायरल होतेय.