
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. ती कायमच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच ती तिची बहीण गौतमी देशपांडे हीच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओदेखील चाहत्यांसोबत शेअर करते. आताही मृण्मयीने असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यात गौतमी रडताना दिसतेय. तर मृण्मयी तिला कुशीत घेऊन बसलीये.