
MRUNMAYEE DESHPANDE: मराठी मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडलीये. मृण्मयीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिने 'अग्निहोत्र' या मालिकेतून कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'कुंकू' मालिकेत दिसली. या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. मृण्मयीने एका मुलाखतीत या मालिकेच्या सेटवरचा किस्सा सांगितला होता जेव्हा तिच्या अभिनयाची पावती तिला मिळाली होती.