
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने काही हिट चित्रपटांमध्येही काम केलंय. तिचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपटही प्रचंड गाजला. लवकरचं ती 'एक राधा एक मीरा' या चित्रपटात झळकणार आहे. मात्र अभिनयासोबतच मृण्मयी आणखी एक खास गोष्ट करतेय ती म्हणजे शेती. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गावात शेती करायला माणसंच मिळत नाहीयेत, गावच्या गाव म्हातारं झालंय असं मृण्मयी म्हणालीये.