

PARU SERIAL AHILYADEVI
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे झी मराठीवरील 'पारू' मालिका. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं आहे. आदित्य आणि पारूच्या जोडीवर प्रेक्षकांचं प्रेम आहेच सोबतच या मालिकेतील अहिल्यादेवीदेखील प्रेक्षकांच्या तितक्याच लाडक्या आहेत. मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक अहिल्यादेवींच्या भूमिकेत दिसतेय. मात्र मालिकेच्या शूटिंगदरम्यान अशी एक गोष्ट घडली होती ज्यामुळे अहिल्यादेवी म्हणजेच मुग्धा ही मालिका सोडणार होती. काय होतं हे कारण?