
संदेश वाहाणे
Entertainment News: या वर्षीचा पहिला सिनेमा ज्यासाठी सगळे उत्सुक होते. त्याला कारणही तसंच होतं. परेश मोकाशी ज्यांचा आतापर्यंत एकही प्रोजेक्ट फेल ठरला नाही. त्यांना आपण अभ्यासू दिग्दर्शक म्हणून ओळखतो, जे खूप परफेक्शनने काम करतात. पण आज मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी बघितल्यानंतर मी खूप निराश झालो. नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल असा मी विचार करून गेलो होतो पण तस झालं नाही.