
२०२४ हे वर्ष लवकरच सगळ्यांचा निरोप घेणार आहे. सरत्या वर्षाला निरोप द्यायला सगळेच सज्ज आहेत. या वर्षी मराठी सिनेसृष्टीनेदेखील अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. 'नाच गं घुमा' ते 'पंचक' आणि 'पाणी' पासून ते जुनं फर्निचर असे अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. आता पुढील वर्षी कोणकोणते चित्रपट येणार याकडे सगळ्यांचं लक्षलागलं आहे. मात्र जानेवारीमध्ये १- २नाही तर तब्बल ७ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.