
सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले. अनेक कलाकारांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. नुकतीच लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर कुणाल भगत सोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या सोबतच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. ती अभिनेत्री म्हणजे 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी.