

malvika gaekwad
esakal
काही कलाकार १- २ चित्रपटात दिसतात आणि नंतर गायब होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. कलाकारही त्यांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे. आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या अभिनेत्रींच्या आयुष्यात लवकरच एक गोंडस पाहुणा येणार आहे. अभिनेत्री काही दिवसात आई होणार आहे. ही अभिनेत्री आहे 'मुळशी पॅटर्न' फेम मालविका गायकवाड. मालविकाने खास पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे.