

MUMTAZ ON AKSHAY KUMAR
ESAKAL
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आणि त्यांच्या आशीर्वाद बंगल्याच्या खूप आठवणी आहेत. त्यांनी हा बांगला राजेंद्र कुमारी यांच्याकडून ३.५ लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यांनी या बंगल्यात सुखाचा आणि दुःखाचा दोन्ही काळ घालवले. याच बंगल्यात असताना त्यांनी अनेक हिट दिले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जावई अभिनेता अक्षय कुमार याने हा बंगला ९० कोटींना विकला. आता अभिनेत्री मुमताज यांनी नुकत्याच त्यांच्या या बंगल्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. अक्षयने तो बंगला का विकला हे आपल्याला अजूनही समजलं नाहीये आणि ते पटलेलं देखील नाहीये असं त्या म्हणाल्या. आजही त्या जागेसमोरून जाताना वाईट वाटतं असंही त्या म्हणाल्या.