
अभिनेत्री मुमताज आणि अभिनेते राजेश खन्ना यांची जोडी त्याकाळची हिट जोडी होती. त्यांनी कित्येक चित्रपटात एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे ते सर्व सिनेमा हिट झाले होते. त्या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर प्रचंड हिट ठरली. त्याकाळात काका आणि मुमताज यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांचं अफेअर आहे असं म्हटलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी राजेश खन्नां सोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. सोबतच लोकांना त्यांचं अफेअर आहे असं का वाटायचं यामागचं कारणही सांगितलंय.