
दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेमकहाणी आजही चर्चिली जाते. त्यांची प्रेमकथा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सोनेरी पान होतं. ट्रॅजेडी क्वीन मधुबाला आणि भारतीय सिनेमाचे व्हिनस म्हणवले जाणारे दिलीप कुमार त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीसाठीसोबतच त्यांच्या ऑफस्क्रीन नात्यासाठीही प्रसिद्ध होते. असं म्हटलं जातं की दिलीप कुमार त्यांच्या वडिलांसोबतच्या कायदेशीर लढाईमुळे मधुबालापासून लांब झाले. मात्र अभिनेत्री मुमताज यांनी नुकतंच त्यांच्या ब्रेकअप मागचं खरं कारण सांगितलं आहे.