

mumtaz
ESAKAL
८०चं दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मुमताज यांनी १९५२ मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'राम आणि श्याम' या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यांना लोकप्रियता तर मिळाली मात्र त्यांच्या स्टारडमचा काळ फार मोठा नव्हता. शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातल्याचं सांगितलं जातं मात्र लग्नानंतर त्यांनी अभिनय सोडावा अशी त्यांची आत होती. त्यामुळे मुमताज यांनी या लग्नाला नकार दिला. अखेर त्यांनी १९७४ मध्ये मयुर माधवानी यांच्याशी लग्न केलं आणि लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यामुळे त्यांचं लग्न चर्चेत राहिलं. आता एका मुलाखतीत त्यांनी या लग्नामागचं कारण सांगितलंय.