
सिनेसृष्टीतून अनेकदा तक्रार केली जाते की एका चित्रपटासाठी किंवा मालिकेसाठी निवड झाल्यानंतर आपल्याला रिप्लेस करण्यात आलं. अशीच तक्रार एका छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने देखील केलीये. स्टार प्रवाह वाहिनीवर 'पिंकीचा विजय असो' ही मालिका प्रचंड गाजली होती. दोन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेत शरयू सोनवणे आणि अभिनेता विजय अंदाळकर मुख्य भूमिकेत होते. मात्र या भूमिकेसाठी आधी आपली निवड झाली होती असा खुलासा 'मुरांबा' मालिकेतील रेवा म्हणजेच अभिनेत्री निशानी बोरुले हिने केलाय.