

MURAMBA SERIAL TWIST
ESAKAL
छोट्या पडद्यावर अनेक मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'मुरांबा'. या मालिकेने प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं आहे. गेले काही वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका दुपारी २ वाजता प्रदर्शित करण्यात येते. यातील अक्षय आणि रमा यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. खूप कठीण प्रसंगांना तोंड देऊन रमा आणि अक्षय एकत्र आले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ येतंय. मालिकेची जुनी व्हिलन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.