

muramba
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा' गेली काही वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय. अनेकदा या मालिकेवर टीकाही करण्यात आली. मात्र तरीही 'मुरांबा' मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत अक्षय आणि रमाची जोडी दाखवण्यात आलीये. मालिकेत या भूमिका अभिनेता शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर साकारताना दिसतायत. दुपारी १. ३० वाजता प्रक्षेपित होणारी मालिका असूनही या मालिकेचा टीआरपी चांगला आहे. मात्र आता या मालिकेत भलताच ट्वीस्ट येणार आहे. मालिकेत अक्षयची स्वरा येणार आहे.