Sunehari Soch Season 3 : मुथूट फायनान्सने लॉन्च केला ‘सुनहेरी सोच’ चा तिसरा सिझन, अभिनेत्री माधुरी दीक्षित शो करणार होस्ट

Muthoot Finance new season : मुथूट फायनान्स आयोजित ‘सुनहेरी सोच’ या सुपरहिट ठरलेल्या शोचा आता तिसरा सिझन सुरू होणार आहे.
Sunehari Soch Season 3
Sunehari Soch Season 3 esakal
Updated on

Sunehari Soch Season 3 :  

मुथूट फायनान्स आयोजित ‘सुनहेरी सोच’ या सुपरहिट ठरलेल्या शोचा आता तिसरा सिझन सुरू होणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की, हा शो बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करणार आहे. या शोमध्ये गोल्ड लोनच्या यशोगाथा जगापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. ज्या लोकांनी गोल्ड लोन घेऊन शुन्यातून विश्व निर्माण केलं, यशाचं उच्च शिखर गाठलं अशा लोकांचा हा शो असणार आहे. 

24 फेब्रुवारी 2025 पासून रेडिओ सिटी 91.1 FM आणि Mirchi 98.3 FM वर हा शो प्रसिद्ध झाला. या शोमधील सहभागी लोकांचे अनुभव इतरांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देतील. गोल्ड लोन हे केवळ कर्ज घेणे नाही आणि ते फेडणे नाही, तर तुमच्या सर्व स्वप्नांना अभिमानाने सत्यात उतरवणे आहे.

लोकांपर्यंत मुथूट फायनान्सचे हे विचार पोहोचवण्यासाठी ‘सुनहेरी सोच’ सीझन 3 चा प्रसार भारतातील 64 रेडिओ स्टेशनवर केला जाईल. शो ला प्रमोट करण्यासाठी रेडिओ स्टेशनवरील 100 हून प्रसिद्ध रेडिओ जॉकी सज्ज आहेत. हा शो एखाद्याच भाषेत नाही. तर, हिंदी, गुजराती, मराठी आणि बंगाली भाषेतही प्रसिद्ध केला जाईल.

विशेष गोष्ट म्हणजे, या मोहिमेत आरजे रौनक, सुदेश भोसले, मनोज जोशी, आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या प्रसिद्ध लोकांचे आवाजही असतील. हे लोक त्यांच्या दमदार आवाजाने सामान्य लोकांच्या यशोगाथा जनमनात पोहोचवतील.

मुथूट फायनान्सच्या गोल्ड लोनने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. त्या लोकांचे काही व्हिडिओजही मुथूट ग्रुपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणार आहेत. युजर्स www.sunherisoch.com या पेजला भेट देऊन ‘सुनहेरी सोच’ मोहीमेचा भाग होऊ शकतात. इथे ते यशस्वी लोकांचे व्हिडिओज पाहू शकतात,तसेच इतरांना शेअर करू शकतात. यामुळे ही चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास मुथूट फायनान्समधील सर्वच लोकांना आहे.

मुथूट समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, अलेक्झांडर जॉर्ज मुथूट म्हणाले की, सोने ही केवळ एक संपत्ती नाही - ती सोनेरी संधीचे आर्थिक प्रवेशद्वार आहे. ‘सुनहेरी सोच’ सीझन 3 द्वारे, आम्ही अशा व्यक्तींच्या यशाचा उत्सव साजरा करतो, ज्यांनी गोल्ड लोन मिळवून त्यांचे जीवन बदलून टाकले आहे. मुथूट फायनान्सशी जोडलेल्या प्रत्येकाचे ध्येय हे  सोन्याच्या बदल्यात पैसे उपलब्ध करणे हे विश्वासार्ह, कमी जोखमेचे आणि आर्थिक समाधान म्हणून संपूर्ण भारतात पुन्हा परिभाषित करणे आहे.

आम्हाला सुनहेरी सोच ही एक चळवळ बनवायची आहे जी कोट्यवधी भारतीयांना आमच्याकडून सुवर्ण कर्ज मिळवून त्यांचे जीवन बदलण्यास मदत करू शकते. जे आमच्या अनेक ग्राहकांनी केले आहे. 2.5 लाखांहून अधिक ग्राहक दररोज आमच्या 7000+ शाखांपैकी एका शाखेत भेट देऊन त्यांच्या यथाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करत आहेत,असेही ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले की, सुनहेरी सोच सीझन-३ मुळे भारतातील कोट्यवधी जनतेला यश आणि प्रगतीच्या सुवर्ण प्रवासाची प्रेरणा मिळावी अशी आमची इच्छा आहे.

मुथूट ग्रुपचे मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी वरिष्ठ महाव्यवस्थापक अभिनव अय्यर म्हणाले की, ‘सुनहेरी सोच’ सीझन 3 हे आमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. कारण हा एक दिवसाचा खेळ नाही. तर त्यासाठी अनेक महिन्यांचे अथक प्रयत्न, काटेकोर नियोजन आणि बारकाईने करण्याची आवश्यकता होती. ‘सुनहेरी सोच’चे सीझन 1 आणि 2 मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले होते. म्हणून आम्ही आर्थिक वर्षाची समाप्ती करण्यासाठी चौथ्या तिमाहीत सीझन-3 लाँच केला आहे.

मधुरीजींनी जे सांगितलं तरे उत्तम असं आहे. सर्व आरजे, प्रादेशिक इन्फ्लूएन्सर आणि सर्व पार्टनर्सच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आशा आहे की "सुनहेरि सोच" रूढीवादी विचार आणि धारणांना बदलून दाखवेल.  गोल्ड लोन हे यशासाठी कसं परफेक्ट कॅटालिस्ट ठरू शकतं हे दाखवू. sunherisoch.com वर, आम्ही एक डिजिटल-फर्स्ट एक्सपिरियन्स तयार करतोय, त्यात प्रेक्षकांना सहभागी होऊन त्यांची यशोगाथा शेअर करण्याची संधी मिळणार आहे.  

ग्राहकांना मिळणार सोन्याची नाणी जिंकण्याची संधी

‘सुनहेरी सोच’ सीझन-3 मध्ये दाखवलेल्या कथा या केवळ प्रेरणादायी कथा नाहीत. हा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो वास्तविक प्रतिबद्धता आणि वाढीसाठी डिझाइन केलेला आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून, 30 भाग्यवान विजेत्यांना सुनहेरी सोच स्पर्धेअंतर्गत 24 कॅरेट सोन्याची नाणी जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. यावेळी एक सुंदर गाणेही लाँच करण्यात आले आहे.

हे गाणं पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/watch?v=W3qwlOu-_z8

गोल्ड लोन हे सशक्तीकरणाचं साधन अशी नवी परिभाषा मुथूट फायनान्सने निर्माण केलीय. यासह विश्वास कायम राखत भारताचा नंबर एकचा सर्वात विश्वासार्ह फायनान्सियल सर्विस ब्रँड बनला आहे. याला प्रतिष्ठित अशा ब्रँड ट्र्स्ट रिपोर्ट इंडिया स्टडीनेही मान्यता दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com