
Marathi Entertainment News : अमेरिका, भारत आणि युरोपसह आशिया खंडामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे तसेच राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांनी २०२४ मध्ये ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ (नाफा)ची स्थापना केली. हॉलीवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा अमेरिकेत घडवून आणत त्यांनी मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलं. यंदा हा सोहळा २५ ते २७ जुलैदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक भविष्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला खास संवाद...