
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुळीपाला यांचा विवाह अखेर पार पडला आहे. शोभिता नागा कुटुंबाची सून झालीये. अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडलाय. ४ डिसेंबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्रीचे सासरे आणि अभिनेते नागार्जुन यांनी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.